वृक्षांची ईजा थांबवण्यासाठी खीळे, बॅनर हटविण्याचा प्रयत्न

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): प्रतिनिधी झाडांनाही आपल्या सारखाच जीव असतो. परंतु कृत्रिम रित्या वावरताना अनेक जण आपले काम काढून घेण्यासाठी झाडे तोडणे, कापणे किंवा जाहिरातिचे फलक लावण्यासाठी खिळे ठोकतात. खिळे ठोकल्याने साहजिक वृक्षांना ईजा पोहचते.

असले खिळे मारू नये या अनुषंगाने ज्ञानविकास प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सिल्लोड कन्नड रस्त्यावर झाडांची पाहणी करून जाहिरात फलक हटवत, खिळे काढून पर्यावरण पुरक संदेश भराडी येथील ज्ञानविकासच्या विद्यार्थ्यांनी दिला. यात मार्गदर्शक म्हणून एस. आर. साळवे यांनी काम केले, तर यश अक्कर, जीवन राकडे, पृथ्वी राकडे, ऋषी शिंदे, ओम काकडे, सोहम शिंदे, गणेश शेलार, भानूसे, आशिकेश काकडे, आर्यन शिंदे, देवेंद्र शेळके, युवराज राऊत, रोहन सुसुंदरे, कृष्णा काकडे, प्रवीण महाजन आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.